महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव
नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्याला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. दिल्लीतील भारत मंडपम येथे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी महाराष्ट्राच्या वतीने हा सन्मान स्वीकारला.
2 free AI summaries left today
0 comments