Anganwadi Sevika: शेतकऱ्यांनंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनाही खुशखबर; दिवाळीपूर्वी मदतीची घोषणा, खात्यात किती रुपये जमा होणार?
Writing the AI summary…
Anganwadi Sevika: महाराष्ट्रात १ लाख ८ हजार ६२७ अंगणवाडी सेविका आणि १ लाख ५ हजार ४७० अंगणवाडी मदतनीस अशी एकूण २ लाख १४ हजार ९७ पदे कार्यरत आहेत. या सर्व कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सरकारकडून प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments